HW News Marathi
मनोरंजन

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

बॉलिवुड अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसणार आहे. रेणुका गेल्या अनेक वर्षांपासुन छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र आता तीखिचडीया विनोदी मालिकेद्वारे पुन्हा एकदा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. खिचडी ही मालिका पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन कलाकार देखील झळकणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई,सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि स्वत: जे. डी. मजेडिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर छोट्या पडद्यावर रेणुका पुनरागमन करतेय. या मालिकेत रेणुका आपल्याल्या प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. एका वेगळ्या धाटणीच्या भुमिकेत रेणुका तिच्या फॅन्सला बघायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे’च्या सिनेमाचे आज ट्रेलर लाँच

News Desk

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

News Desk

‘सेक्रेड गेम्स २’ लाही ‘मीटू’चा फटका ?

News Desk