HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; स्नेही राजेश दामलेंची माहिती

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती ही चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनद्वारे दिली आहे. विक्रम गोखले हे व्हेंटिलेटरवर आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी माध्यमांना दिली आहे. “विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून त्यांची लाइफ सपोर्टवर आहे. त्याच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा,” अशी माहिती विक्रम गोखले यांची मुलीने बुधवारी (24 नोव्हेंबर) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगत दिली आहे.

विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या अफवा काल रात्री पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गोखले कुटुंबियांचे स्नेही यांनी राजेश दामलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते राजेश दामले म्हणाले, “विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत काही कॉम्प्लिकेशन्स झाले आहेत. डॉक्टर प्रयत्न करत आहेत. परंतु, विक्रम गोखले त्यांचे शरीर हवे तसे साथ देत नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.  विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम गोखलेंवर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी अभिनेते दिनेश साळवी यांचे निधन

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

News Desk

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

swarit