HW News Marathi
मनोरंजन

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार

मुंबई | टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावर एका महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात या महिनेने तक्रार दाखल केली असून अद्याप भूषण कुमार यांना अटक करण्यात आलेली नाही. भूषण कुमार यांनी कामाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

चित्रपटात काम देण्यासाठी भूषण कुमार यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली त्याचप्रमाणे करिअर उद्ध्वस्त करुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील काहीच महिन्यांपूर्वी या महिलेने केला होता. त्यावेळी भूषण कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी सिनेसृष्टीत अगदी नवीन होते. दुसऱ्याच दिवशी मला चित्रपटातून देखील काढून टाकण्यात आले’ असेही या पीडित महिलेने सांगितले आहे.

काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. ‘संजू’ सिनेमाच्या निर्मितीदरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार झाल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. राजकुमार यांनी ६ महिन्यात अनेक वेळा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधींनी सुट सोडून धोतर का परिधान केले ?

News Desk

तनुश्री दत्ताला नानांनी बजावली कायदेशीर नोटीस

News Desk

आगमन बाप्पाचे | सुट्टीचा मुहूर्त साधत ‘श्रीं’ च्या आगमनाला सुरुवात

News Desk