HW News Marathi
मनोरंजन

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

मुंबई : एका १८ वर्षीय तरुणीचे ९ वर्षांच्या मुलाशी लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेले रहस्यमय नातेसंबंध, अश्लीलता आदीबाबत चित्रकरण असल्यामुळे सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ यामालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. Change.org या वेबसाइटवरून माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींकडे याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘Change.org’ या वेबसाइटवर मानसी जैन यांनी ही याचिका दाखल केली. सुमारे १८ हजार लोकांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. ‘नऊ वर्षांचा मुलगा त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलीशी लग्न करतो, असे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित होते. प्राइम टाइममध्ये प्रेक्षकांच्या मनावर ही मालिकाकाय परिणाम करते, याचा विचार करावा. या मालिकेवर बंदी आणावी, अशी आमची मागणी आहे. अशा प्रकारच्या मालिकांचा आमच्या मुलांवर काही परिणाम होऊ नये, अशी आमची इच्छा आहे,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक

News Desk

नितेश राणेंकडून लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण

News Desk

नागपूरकरांच्या प्रेमाने भारावले बिग बी

News Desk