HW News Marathi
मनोरंजन

पाच राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होणार नाही

मुंबई | संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित पद्मावत सिनेमा रिलीज होणार आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून आंदोलने सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गोवा या पाच राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन मोठ्या राज्या हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या पाच राज्यात पद्मावत विरोधात आंदोलन होण्याची शक्यता आहे. म्हणून देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स सिनेमागृहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने हिंसाचाराची भितीने हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्रकडून मिळाले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने देखील हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी हिरवा कंदील दिला असून ही करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या सिनेमावर बंदी घाण्याची मागणीवर ठाम आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३० व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल घोषित

swarit

व्ही. शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

News Desk

येशूचा जन्म नक्की कधी झाला ?

News Desk