HW News Marathi
मनोरंजन

पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

मुंबई | पंडीत तुळशीदार बोरकर यांचे निधन झाले. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी पंडीत बोरकर ८३ वर्षांचे होते. ज्येष्ठ हार्मोनियम वादक म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होेत.त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

पं. तुळशीदास बोरकर हे मूळचे गोव्यातील बोरी गावचे. चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण बोरीमध्ये तर पुढील शिक्षण सावंतवाडी येथे झाले. बोरी गावातील नवदुर्गा मंदिरात लहानपणी त्यांनी कीर्तने-प्रवचने खूप ऐकलेली. पण कीर्तन-प्रवचनात बुवा काय सांगतात यापेक्षा त्यांचे लक्ष बुवांना संगीतसाथ करणाऱ्या ऑर्गन/संवादिनीवादकाकडे, त्यांच्या बोटांकडे जास्त असायचे. आई जयश्रीबाई गाणे शिकलेल्या होत्या. नाटकातूनही काम करत असत. मोठी बहीण नलिनी बोरकर या छोटा गंधर्व यांच्या ‘कलाविकास नाटय़’ संस्थेत काम करत होत्या. त्यामुळे कलेचा वारसा लहानपणापासूनच मिळाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BREAKING NEWS | जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | ‘खड्डे आणि वाहतूक कोंडीचा’ देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

News Desk

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk