HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचे निधन

मुंबई | बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेता कादर खान यांचे निधन झाले आहे. ८१ वर्षीय कादर खान हे गेल्या काही वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपरन्यूक्लियर पाल्सी या आजाराने त्रस्त होते. कॅनडा येथील श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र काल (३१ डिसेंबर) त्यांच्या संध्याकाळी ६ वाजता अंतिम श्वास घेतला. दुपारी ते कोमात गेलेत आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुलागा सरफराज खानने त्यांच्या निधनांच्या बातमीला दुजोरा दिला आहे. कादर खान यांच्या जाण्यांनी संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. खान यांच्यावर कॅनेडामध्ये अंत्यस्कार करण्यात येणार आहे.

कादर खान यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक जास्त हिंदी चित्रपटात काम केले आहे. खान हिंदी सिनेसृष्टील उत्कृष्ट कॅमेडिय होते. महानायक अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी असे ट्विट केले होते. मात्र, सोशल मीडियात त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. कादर खान यांच्या निधनाचे वृत्तही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कादर खान यांचा मुलगा सरफराजने ही निव्वफ अफवा असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कादर खानचा अल्प परिचय

कादर खान यांचा जन्म अफगान-भारतीय येथे २२ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला दाग या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी वकिलाचा भूमिका साकारली होती. यात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी रणधीर कपूर व जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते. मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा लिहल्या आहेत. यानंतर त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला. १९८१मध्ये बाप नंबरी बेटा दस नंबरी या सिनेमातील कादर खानच्या भूमिकेला उत्कृष्ट विनोद वीर असा ल्फिम फेअर पुरस्काराने सन्मानित केले होते. बॉलिवूडमध्ये त्यांनी कॅमिडिन भूमिकेसोबत उत्तम खलनायकाची भूमिका देखील साकारल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक ‘या’ दिवशी होणार रिलीज

News Desk

हा आहे ‘तानाजी’चा फर्स्ट लूक

News Desk