HW News Marathi
मनोरंजन

वेबसिरिज ‘बॅडमॅन’चीमॉस्को चित्रपट महोत्सवात निवड

रुपेश दळवी

मुंबई – ‘मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागासाठी बॉलीवूडमधील बॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्हर यांच्या वेबसिरिजने परदेशवारी केली. ही वेबसिरिज सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. वायकॉम 18 च्या ‘वूट’ या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर बॅडमॅन ही वेबसिरिज दाखवली गेली होती. किंबहुना हा एक प्रकारचा मॉक्युड्रामा असून, ही भारतातील सर्वात पहिली मॉक्युमेंट्री फिचर फिल्म आहे. मुख्य म्हणजे वेब विश्वातील प्रेक्षकांसाठी ही सर्वात पहिली फिचर फिल्म असल्याचंही म्हटलं जात आहे.

‘मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागात याआधी राज कपूर, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट दाखवले गेले त्या ठिकाणी माझ्यासारख्या खलनायकी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची फिचर फिल्म दाखवली जाणं ही अभिमानाची बाब आहे, असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी संपूर्ण टीमचे आभारही मानले. या वेबसिरिजमध्ये मी कोणतीही व्यक्तिरेखा साकारत नसून गुलशन ग्रोव्हर म्हणूनच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे असे गुलशन ग्रोव्हर यांचे म्हणणे आहे. केवळ या वेबसिरिजची कथा ही काल्पनिक आहे. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 24 जूनला व लंडन-भारतीय चित्रपट महोत्सवात 27 जूनला ही वेबसिरिज दाखवलं गेला आहे. 4 एपिसोडची ही वेबसिरिज आहे. यात चंकी पांडे नकारात्मक भूमिकेत आहे. तसेच ऋषी कपूर, कोरिओग्राफर-निर्माता फराह खान, शूजीत सरकार व मनिषा कोईराला ही मंडळी पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत आहेत. भविष्यातदेखील मला वेबसिरिजमध्ये काम करायला आवडेल असं यावेळी गुलशनने आवर्जून सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Anant Chaturdashi | बाप्पाचे हे वर्ष शंभरावे ! 

swarit

Anant Chaturdashi |गणेशोत्सव मंडपासमोर मोटारसायकल हळू चावण्यास सांगितल्याने हत्या

swarit

पाच राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित होणार नाही

News Desk