HW News Marathi
मनोरंजन

‘हाऊसफुल-4’च्या सेटवर महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग

मुंबई | चित्रकूट स्टुडिओमध्ये ‘हाऊसफुल-4’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. ज्युनिअर आर्टिस्टवर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. डान्सर आमीर शेख आणि पवन शेट्टी यांच्यातील जुना वाद होता. त्याचा बदला घेण्यासाठी पवन शेट्टी आपल्या साथीदारांसह चित्रकूट स्टुडिओत जबरदस्तीने घुसला आणि त्याला बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी महिला ज्युनिअर आर्टिस्टने आरडाओरड केली. तेव्हा पवन शेट्टीने तिचा विनयभंग केला. पवन शेट्टीविरोधात पिडीत महिलेने आंबोली पोलीस ठाण्यात ३५४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पवन शेट्टी असे या आरोपीचे नाव असून, तो डान्सर म्हणूनच ‘हाऊसफुल्ल – 4’ सिनेमाशी जोडला गेला होता. विनयभंगाची घटना घडली. त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख आदी कलाकार उपस्थित होते. या सर्व प्रकरानंतर अक्षय कुमारने पीडित महिलेला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. यानंतर पीडित महिला ज्युनिअर आर्टिस्ट इतर सहकाऱ्यांसोबत आंबोली पोलीस जावून डान्सर पवन शेट्टीविरोधात तक्रार दिली. पवन शेट्टीविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगमन बाप्पाचे | ढोल ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

News Desk

राम कदम पुन्हा चर्चेत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड ट्विटरद्वारे ट्विट

News Desk

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

News Desk
मनोरंजन

जाणून घ्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या चित्रपटाचे किती होते मानधन

News Desk

अश्विनी सुतार | तो आला, त्याने पाहिलं, त्याने हसवलं आणि तो हसवतच राहिला असा मराठी चित्रपटसृष्टीचा एक अत्यंत लोकप्रिय, विनोदी आणि गुणी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला सर्वांचाच लाडका ‘लक्ष्या’. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विदूषक, विनोदाचा बादशहा अशा अनेक नावांनी प्रेक्षकांसमोर आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. लक्ष्या म्हणून त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली जागा कुणीही घेऊ शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्माला आले म्हणून त्यांचे नाव लक्ष्मीकांत असे ठेवण्यात आले होते.

आत्माराम भेंडे यांनी बबन प्रभूच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाची निर्मिती नव्याने करणार असल्याची घोषणा केली. बबन प्रभूची व्यक्तीरेखा लक्ष्मीकांत बेर्डे साकारणार होते. तसेच महेश कोठारे यांचे आई वडीलसुद्धा या नाटकात काम करीत होते. या नाटकाची तालीम पाहण्यासाठी महेश कोठारे गेले होते. जेव्हा त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची झलक पाहताच ते अत्यंत प्रभावित झाले होते. कारण लक्ष्याने बबन प्रभूची भूमिका तंतोतंत साकारली होती. त्यावेळी महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक रुपया देऊन आपल्या चित्रपटासाठी साईन करून घेतलं होतं. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक वचन दिले होते. ते म्हणाले होते की, “जेव्हा मी माझा पहिला सिनेमा दिग्दर्शित करेन तेव्हा मुख्य नायकाच्या भूमिकेत तू (लक्ष्मीकांत बेर्डे) असशील.”

त्यावेळी धुमधडाका या चित्रपटाची कल्पना महेश कोठारे यांच्या डोक्यात होती. लक्ष्मीकांत यांनी देखील ही ऑफर आनंदाने स्वीकारली. त्याकाळी धुमधडाका या सिनेमाने अक्षरशः इतिहास घडवून आणला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांना या सिनेमाने विनोदवीर म्हणून ओळख दिलीच. पण या सिनेमानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीचे नाते देखील अधिक घट्ट झाले.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे खेरवाडीच्या युनियन हायस्कुलमधून शिक्षण झाले. तर भवन्स महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. पण मोठं होऊन ‘बस कंडक्टेर’ बनायचे असे त्यांचे स्वप्न होते. याचे कारणही मोठं गंमतीदार आहे. लहान असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटायचे कि, बसमध्ये तिकीट विकून जमलेले सर्व पैसे हे बस कंडक्टेरच घरी घेऊन जातो. परंतु मोठं झाल्यावर त्यांना हे पैसे बस कंडक्टेरचे नसतात हे समजले. त्यानंतर त्यांनी हे स्वप्न सोडून दिले. अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रंगभूमीवर प्रतिभावान आणि गुणी कलाकार म्हणून मोठे नाव कमावले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अप्रतिम अभिनय आणि विनोदी शैली यामुळे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे प्रचंड प्रभावित झाले होते. विनोदाचं अचूक टायमिंग हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वैशिष्ट्य होते. विनोदी अभिनेता अशी जरी त्यांची ओळख असली ते त्यांनी कित्येक गंभीर भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले.

आपल्याला अभिनय क्षेत्रात काम मिळावं म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी वेळ पडली तेव्हा डोअर किपरची नोकरीदेखील केली होती. ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठी लोकप्रियता दिली. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांना एक नवी ओळख मिळाली आणि ते अत्यंत लोकप्रिय झाले. तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ऑनस्क्रीन ट्युनिंग हे सर्वोत्कृष्ट होते. या दोघांनीही प्रेक्षकांना मनमुराद हसविले.

 

Related posts

सचिन च्या उपस्थितीत मनसेचा दीपोत्सव

swarit

Vijay Diwas : अमेरिकन व सोव्हिएट हस्तक्षेप

News Desk

जाणून घ्या…कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल

News Desk