मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo अंतर्गत अभिनेते नाना पटेकरांवर काहीच दिवसांपूर्वी गैरवर्तनाचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तनुश्रीच्या या आरोपानंतर संपूर्ण सिनेसृष्टी ढवळून निघाली होती. आता पुन्हा एकदा तनुश्रीने एक स्टेटमेंट दिले की, यात तिने अभिनेते नाना पाटकेर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दीकी आणि अभिनेत्री राखी सावंत यांना शाप दिला आहे. “माझा शाप तुम्हाला भोवणार आहे. त्यापासून तुम्ही वाचू शकणार नाही.”,असे शाप तनुश्रीने दिला आहे.
तनुश्रीने पाचही जणांना शाप देताना म्हटले की, “मी मनापासून, आत्म्यातून नाना पाटेकर, राखी सावंत, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि सामी सिद्दीकीला शाप देते. माझा शाप केवळ या पाच जणांना लागणार नाही, तर त्यांच्या जवळच्या सर्व जणांना माझा शाप लागणार आहे. मी जो मानसिक आणि शारिरीक त्रास सहन केला आहे. तसा त्रास या पाच जणांना, त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सहन करावा लागेल. कोणताही देव, शक्ती, पुजारी या लोकांना माझ्या शापापासून वाचवू शकणार नाही. परमेश्वर या लोकांना त्यांची शिक्षा देईल.”
२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. अमेरिकेहून परतलेल्या तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान ‘मी टू’ मोहिमेबद्दल बोलताना हे आरोप केले आहेत. पण वेळ आली तेव्हा त्यानेही माझी मदत केली नाही. माझ्या एफआयआरमध्ये त्याचेही नाव आहे. केवळ एका व्यक्तिने नाही तर सेटवर हजर असलेल्या चार लोकांनी माझे शोषण केले. “मी केवळ २४ वर्षांची होते व बॉलिवूडमध्ये करिअर बनवू इच्छित होते. गणेश आचार्यने या घटनेनंतर मीडियात माझ्याबद्दल अपप्रचार करून माझे करिअर संपवले. राखी सावंत माझ्याबद्दल अपमानास्पद बोलली. यामागेही गणेश आचार्य याचाच मेंदू होता.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.