HW News Marathi
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | दादरच्या बाजारपेठेत इकोफ्रेंडली मखरे

धनंजय दळवी | न्यायालयानेही पर्यावरणाला घातक असणार्‍या गोष्टींना परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत थर्माकोलवरील बंदी कायम ठेवली आहे. राज्य सरकार व न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत थर्माकोलला पर्याय म्हणून गणेशोत्सवासाठी इको-फ्रेंडली आकर्षक मखर सध्या दादरच्या बाजारात उपलब्ध आहेत.

दादर येथील अरुण दरेकर, गणेश म्हात्रे, रवी गिरकर या तीन कलाकार मित्रांनी एक नवी कल्पना घेऊन इकोफ्रेंडली मखर तयार केले.हे मखर दादर येथील अक्षय डेकोरेटर्स मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गेली तीस वर्षे मखर क्षेत्रात असणारे दरेकर यांनी थर्माकोल बंदीला स्वीकारत असलेला माल विकायचा नाही असे ठरवून यंदा बाजारात इकोफ्रेंडली मखरचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. यावेळी कोर्टाने घेतलेल्या निर्णयाबद्दल फायदा देखील झाला. तसेच तोटा देखील झाला असल्याचे दरेकर यांनी एच डब्लूला सांगितले.

कोणत्या कोणत्या साहित्याचा केला आहे वापर –

हे इकोफ्रेंडली मखर बनविण्यासाठी लाकूड, सन बोर्ड, फोम, सुपारीचे साल, सुतळ, ज्यूट कापड, मातीची भांडी व पुठ्ठ्याचा वापरकरून सुबक मखरांच्या निर्मितीवर यंदा अधिक भर दिला गेला आहे. दादर, पश्चिमेला वाचनालय मार्ग येथे नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेले आकर्षक व नेत्रदीपक मखर विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

सामाजिक संदेश आणि लोकांची विशेष पसंती –

यंदा इकोफ्रेंडली माखरांना मागणी आहे . तसेच विविध संकल्पनांवर आधारित सुमारे ५० ते ६० प्रकारच्या इको फ्रेंडली मखरांची निर्मिती करण्यात आली आहे. हे मखर ४×३ या आकारामध्ये यंदा उपलब्ध आहेत. यांची किंमत ८,००० ते १४,००० इतकी आहे. पण ग्राहकांच्या मागणीनुसार पुढच्यावर्षी यामध्ये लहान मखर देखील बनविण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. तसेच या इकोफ्रेंडली मखरांमध्ये सुखकर्ता दुःखहर्ता, स्वामी समर्थ, लक्ष्मी पद, विठू माउली, कन्हैया, मयूर, त्रिशूळ डमरू यांसारख्या मखरांना लोकांची विशेष पसंती मिळत आहे. श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता आणि पर्यावरण संवर्धनाची जागरूकता असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

कशी काळजी घ्याल आणि उपयोग –

इकोफ्रेंडली मखर हे सुतळ, ज्यूट कापड इ. वस्तूपासून बनविले आहेत. त्यामुळे अगरबत्ती किंवा दिव्याच्या खाली केळीचं पान किंवा ताटली ठेवावी. जेणेकरून मखर जळणार नाही. अश्या प्रकारे मखर ग्राहकांना देताना त्याची काळजी काशी घ्यावी हे देखील विक्रेत्यांकडून ग्राहकांना सांगण्यात येत आहे. थर्माकोलच्या मखरांवर बंदीबाबत गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर थर्माकोल बंदीवरून वादविवाद होत होता. पण मखर विक्रेत्यांनी वेळीच थर्माकोलला पर्याय म्हणून नैसर्गिक वस्तूंपासून मखरांच्या निर्मितीवर भर दिला असता तर आज मखर विक्रेते व मखर बनवणार्‍या कलाकारांचे नुकसान झाले नसते, असे मत विविध डेकोरेटर्संनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आर्यन खाननं कोणतंही ड्रग्ज घेतलं नाही!”, हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

News Desk

संगीत सम्राट पर्व २चा विजेता आज ठरणार

News Desk

मोबाईलवर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांनाही मिळणार अनुदान

News Desk