मुंबई | गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. जवळपास २२ तासांच्या उत्साहपूर्ण,ढोलताशांच्या आणि जल्लोष मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानंतर मुंबईतील गणपती विसर्जन आज (१३ सप्टेंबर) संपन्न झाले आहे. गेल्या दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज गिरगाव चौपाटीत बाप्पाची शेवटची आरती घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला.
#WATCH Maharashtra: Procession in Mumbai as the Ganpati idol at Lalbaugcha Raja is being taken for immersion. Visuals from earlier this morning. pic.twitter.com/PgMcacL88P
— ANI (@ANI) September 13, 2019
लालबागचा राजा काल (१२ सप्टेंबर) सकाळी ११ च्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली तो रस्ता गुलालाने पूर्णपणे न्हाऊन निघाला होता.
तसेच दुसरीकडे पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनंतर प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आज सकाळी ८ वाजता महापालिकेच्या हौदात विसर्जन केले आहे. लक्ष्मी रस्त्यावरुन रात्रभर दगडूशेठची मिरवणूक सुरु होती. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी सकाळपर्यंत गर्दी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.