HW News Marathi
मनोरंजन

प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये मोफत वायफाय

मुंबई | उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रयागराज कुंभमेळा २०१९ साठी साधारण बारा कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मौनी आमावस्या दिवशी तीन कोटी भाविक येतील अशी अपेक्षा असून २० लाख भाविक येतील असा अंदाज आहे या दहा लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश असणार आहे. तसेच या कुंभमेळ्यामध्ये मोफत वायफायची सुविधा करण्यात आली आहे.

प्रयाग्रज कुंभ मेला २०१९ बाबत आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना हे उपस्थित होते यावेळी ते म्हणाले हा कार्यक्रम देशात चार ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज येथे होणारा हा कार्यक्रम हे आकर्षण स्थान असून देशातच नव्हे तर परदेशातही याबाबत उत्सुकता दिसून येत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे युनेस्कोतर्फे कुंभमेळ्याची गणना मानवी संस्कृती तील अद्वितीय सांस्कृतिक वारसा या यादीत केली गेली आहे. तसेच यावेळी कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती त्यांनी दिली.

पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा भागामध्ये आलीशान टेण्ट सिटी स्थापन करण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पार पहावे, यासाठी ३० थिमॅटिक गेट्स उभारण्यात आली असून या ठिकाणी २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

प्रयागराज कुंभमेळा विषयी अधिक माहितीसाठी पर्यटकांनी २०१९ https://kumbh.gov.in/en या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे खोटे आहे ते खोटेच आहे

Gauri Tilekar

Kumbh Mela 2019 : आज पहिले शाहीस्नान

News Desk

आगमन बाप्पाचे | सुट्टीचा मुहूर्त साधत ‘श्रीं’ च्या आगमनाला सुरुवात

News Desk