HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या…कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल

नवी दिल्ली | कुंभमेळ्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा मेळा असल्याचे मानले जाते. भारतातील पवित्र मानल्या जाणाऱ्या चार नद्यांच्या तीरावरच कुंभमेळा भरतो. ज्यामध्ये हरिद्वार येथील गंगा, उज्जैन मधील शिप्रा, नाशिकची गोदावरी आणि गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या प्रयागराज (अलाहबाद) येथे. या मेळ्या बद्दलच्या विविध मान्यता, परंपरा आहेत. या ठिकाणी येणारे भाविक आणि विषेश म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होणारे लाखो साधू-संत त्यांची वेशभूषा, त्यांच्याशी निगडीत अनेक आश्चर्यकारक बाबींचे खास आकर्षण कुंभमेळ्यात जाणाऱ्या प्रत्येकाला असते. जाणून घेऊ, कुंभमेळ्यातील विषेश आकर्षण असाणाऱ्या आखाड्यांबद्दल.

आखाडा म्हणजे काय ?

कुंभमेळ्यामध्ये या आखाड्यांचे विशेष महत्व असते. आखाडा या शब्दाची सुरुवात मुघल काळात झाल्याच मानले जाते. आखाडा हा साधूंचा असा समूह असतो जो शस्त्रविद्येतही पारंगत असतो.

पेशवाई काय असते ?

जेव्हा कुंभमेळ्यातील हे साधू-संत वाजत गाजत जातात, त्याला पेशवाई असे म्हटले जाते. असे म्हटले जात की, आद्य शंकराचार्य यांनी ८ शतकात १३ आखाड्यांची स्थापना केली होती. तेव्हापासून हे आखाडे अस्तित्वात आहे. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यात १४ वा आखाडा देखील असणार आहे.

जाणून घेऊया या १४ आखाड्यांबद्दल :

१) अटल आखाडा

या आखाड्याचे इष्ट देव गणपती बाप्पा आहेत. या आखाड्यात फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य दिक्षा घेऊ शकतात. अन्य कुणालाही यामध्ये प्रवेश नसतो. याला सर्वात प्राचीन आखाड्यांपैकी एक मानले जाते.

२) आवाहन आखाडा

पूजनीय श्री दत्तात्रय आणि श्री गजानन महाराज आहेत. या आखाड्याचे केंद्रस्थान काशी हे आहे.

३) निरंजनी आखाडा

हा आखाडा सर्वात जास्त शिक्षित अखाडा आहे. यामध्ये जवळपास ५० महामंडलेश्वर आहेत. यांचे इष्ट देव शंकराचे पुत्र कार्तिक भगवान आहे. या आखाड्याची स्थापना इ.स. ८२६ मध्ये झाली असल्याचे म्हटले जाते.

४) पंचाग्नि आखाडा

या आखाड्यात केवळ ब्रम्हचारी ब्राम्हणच दिक्षा घेऊ शकतात. यांची इष्ट देव गायत्री माता आहे. तर यांचे मुख्य केंद्र काशी येथे आहे.

५) महानिर्वाण आखाडा

महाकालेश्वर जोतिर्लिंगाच्या पूजेची जबाबदारी याच आखाड्याची आहे. यांचे इष्ट देव कपिल ऋषी आहेत. याची स्थापना इ.स. ६७१ ला केल्याचे सांगितले जाते.

६) आनंद आखाडा

या आखाड्याची स्थापना इ.स. ८५५ साली झाली. या आखाड्यामध्ये आचार्याचे पद हे मुख्य मानले जाते. याचे मुख्य केंद्र वाराणसी आहे.

७) निर्मोही आखाडा

वैष्णव संप्रदायातील आखाड्यांपैकी सर्वात अधिक आखाडे यामध्ये समाविष्ट आहेत. याची स्थापना १७२० मध्ये रामानंदाचार्य यांनी केली. या आखाड्याचे मंदिरे उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, राजस्थान इत्यादी ठिकाणी आहे.

८) बडा उदासीन पंचायती आखाडा

याची सुरुवात १९१० मध्ये झाली. याचे संस्थापक श्रीचंद्रआचार्य उदासीन आहे. सेवा करणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे.

९) नया उदासीन आखाडा

याची सुरुवात इ.स.१७१० मध्ये झाली. बडा उदासीन आखाड्यातील साधुंनी या आखाड्याची स्थापना केली होती अशी मान्यता आहे.

१०) निर्मल आखाडा

याची स्थापना श्रीदुर्गासिंह महाराज यांनी केली. यांचे इष्टदेव पुस्तक श्री गुरुग्रंथ साहिब आहे. असे सांगितले जाते की, इतर आखाड्यांप्रामाने धुम्रपान करण्याची परवानगी या आखाड्यात नाही.

११) वैष्णव आखाडा

या आखाड्याची स्थापना मध्यमुरारी यांच्या मार्फत करण्यात आली होती.

१२) नागपंथी गोरखनाथ आखाडा

या आखाड्याची स्थापना इ.स. ८६६ मध्ये झाली होती. यांचे संस्थापक पीर शिवनाथजी आहेत.

१३) जूना आखाडा

रुद्रावतार दत्तात्रेय हे त्यांचे आराध्य दैवत आहेत. या आखाड्याचे आश्रम हरिद्वार येथे आहे. स्वामी अवधेशानंद गिरी महाराज या आखाड्याचे पीठाधीश्वर आहेत.

१४) किन्नर आखाडा

आतापर्यंत कुंभमेळ्यात फक्त १३ आखाडेच होते. या १३ आखड्यांचीच पेशवाई होत होती. मात्र, यावेळी कुंभमेळ्यात अजून एक आखाडा सहभागी झाला आहे. ज्याचे नाव आहे किन्नर आखाडा. या आखाड्याची महामंडलेश्वर आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBirthdayLataDi | राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजय पाटील यांना जाहीर

News Desk

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

Atul Chavan

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk