मुंबई | निवडणूक आयोग गणेशोत्सवानंतर राज्यातील निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही गणेश उत्सावानंतरच झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे.
राज्यात येत्या २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे. २ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून १२ सप्टेंबरला अनंत चतुदर्शी आहे. या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना काढण्यात येऊ शकते तर नामनिर्देशनपत्र घटस्थापना व नवरात्री कालावधीत भरण्याची मुदत असणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण २० ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे २३ अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीचा क्रम
२०१४ मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता.
गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर होतील. तर २५ ऑक्टोबर २०१९ पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मतदान घेण्यावर आयोगाची भूमिका असेल .
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.