HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

मुंबई। लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत मोठा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी समोर आला  होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून दलित आणि मुस्लीम अशा अनोख्या आघाडीत फूट पडली आहे. यानंतर एमआयएम आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लिढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमआयएम ७४ जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी मुलाखती सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयएमने औरंगाबादमध्ये काल ( १० सप्टेंबर) मालेगाव,बडगाव,भोकर,नांदेड या मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. टप्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत, असे जलील यांनी यावेळी सांगितले. आता कोणासोबतही युती नसल्यामुळे कसलेही बंधन नाही. त्यामुळे सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असेही ते म्हणाले.

दलित समाज किंवा इतर अन्य समाजावर कोणा एका पक्षाचे वर्चस्व आहे, असे कोणी समजू नये असे जलील यांनी म्हटले आहे. आघाडी झालेली नसल्यामुळे अनेक पक्षातील नेत्यांनी एमआयएमशी उमेदवारीसाठी संपर्कात आहेत, असे जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दरम्यान त्यानंतर एमआयएम वंचित बहुजन आघाडीसोबत लढणार नसल्याचे जलिल यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज एमआयएमने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.

Related posts

मनसे विधानसभा लढविणार, मनसेच्या एकमेव नगरसेवकाने दिले संकेत

News Desk

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

News Desk

आम्ही यात्रा काढल्यानंतर अनेकांना जाग आली !

News Desk