HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

इस्लामपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा सांगली रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कनडनाथ कोंबड्या फेकल्या. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कडकनाथ कोंबडी प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

महारयत अग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दखवून फसवणूक केली. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली होती. यानंतर यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तर, खोत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

तसेच दुसरीकडे कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. ईडीमार्फत चौकशी न केल्यास ईडी कार्यलयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. याचेच पडसाद मुख्यमंत्र्यांची यात्रा सांगली येथे पोहचली असता पाहायला मिळाले.

 

 

Related posts

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक, युतीच्या जागा वाटपावर चर्चा

News Desk

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

News Desk