HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आज शिवसेनेत करणार प्रवेश

मुंबई । एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा या मतदार संघातून निवडणूक लढणर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती आज (१३ सप्टेंबर) दुपारी ६ वाजताच्या सुमारास प्रवेश होणार आहे.

प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी त्यांच्या पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याचा रंगल्या होत्या.. यानंतर राज्याच्या गृह विभागाने शर्मा यांचा मंजूर केल्यामुळे त्यांचा राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. सध्या वसई-विरार परिसरात ठाकूर कुटुंबाची वर्चस्व आहे. त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेना नालासोपारामधून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

प्रदीप शर्मा यांचा अल्प परिचय

१९८३ बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती. शर्मा यांनी प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत,१०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पोलीस सेवेत ते पुन्हा परतले.शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर ‘रेगे’ नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक ९ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

News Desk

Shivendra Raje Bhosale NCP | बाबाराजे, तुम्ही भाजपमध्ये जा ! कार्यकर्त्यांच्या भावना

Gauri Tilekar

Chitra Wagh| पळणारी आणि घाबरणारी मी नाही ..

News Desk