धनंजय दळवी | आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ आचारसंहिता लागू होऊ शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढविता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचार केला होता. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात मनसे संभ्रमात असल्याची समोर आले आहे. पण आता मनसे येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तूर्डे यांनी संकेत दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढविणार का नाही ? यावर सध्या कोणीही बोलायला तयार नाही. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एच डब्लू शी बोलताना सांगितले की, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लवकरच विधानसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करणार असल्याचे सांगितले. मात्र, पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
संजय तुर्डे हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत. आणि कलिना विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक देखील आहे. त्यातच त्यांनी आमचे ठरले, असा मचकूर असलेले फलक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे चित्र स्पष्ट होते आहे. त्यामुळे आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तर संकेत दिलेच आहे. स्वतः राज ठाकरे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.