मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. लेखक विक्रम संपथ यांच्या ‘सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले. त्यावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, अशी मागणीही ठाकरेंनी केली.
Shiv Sena Chief Uddhav Thackeray in Mumbai: If Veer Savarkar would have been the Prime Minister of this country then Pakistan would not have even born. Our government is Hindutva govt & today also I demand Bharat Ratna for Veer Savarkar. pic.twitter.com/sRkfnt58IH
— ANI (@ANI) September 17, 2019
ठाकरे पुढे म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केलेले काम मी नाकारत नाही. मात्र देशात केवळ दोनच घराणी नाहीत. दरम्यान, कॉंग्रसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत, लोकसभेच्या प्रचारात राहुल गांधी यांनी सावरकरांना पळकुटे म्हटले होते. त्यावेळी राहुल गांधींना नालायक बोलणारा पहिला मीचे होता. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत. राहुल गांधींना ‘सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ हे पुस्तक वाचायला दिले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर येथे विक्रम संपथ यांच्या 'सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. pic.twitter.com/tjrhO9FeuX
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 17, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.