HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेचा ४ फेब्रुवारीला उस्मानाबाद जिल्ह्यातून शुभारंभ

मुंबई जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी प्रचाराचा शुभारंभ उद्या ४ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी २.३० वाजता येणेगूर ता. उमरगा येथे राज्यातील प्रमुख नेत्यांची पहिली जाहीर सभा होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवाजीराव पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. पतंगराव कदम आ. नसीम खान, आ.मधुकरराव चव्हाण, आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, आ. अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी ५.१५ वाजता खा. अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर येथे तर रात्री ७.३० वाजता जगदंबा चौक, सोलापूर येथे सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेणार आहेत.

तत्पूर्वी दुपारी १२ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk

“…पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

आघाडी सरकारने वेगवेगळे लढा, चंद्रकांत पाटील यांचे ओपन चॅलेंज…! 

News Desk