HW News Marathi
महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद

मुंबई: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटल्याने सत्ताधारी भाजप खुशीत असतानाच, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद उघडीस आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पाठ फिरवली आहे आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याचीही घोषणा केली आहे. विरोधकांमधील ही फूट देवेंद्र सरकारच्या पथ्यावर पडू शकते.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था, झोपू योजनेतील घोटाळा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारची कोंडी करतील, असे बोलले जात होते. परंतु, आज विरोधकांचा वेगळाच ‘रागरंग’ दिसला.

राज्य सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिलय. या चहापानाला ते जाणार की प्रथेप्रमाणेच बहिष्कार टाकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशातच, विरोधी पक्षनेत्यांच्या घरी होणाºया बैठकीला अनुपस्थित राहून राष्ट्रवादीने अचानाक ‘एकला चालो रे’चा पवित्रा घेतला. एरव्ही, विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतात. मात्र, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतही सहभागी न होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलाय. धनंजय मुंडे ४ वाजता स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केलय. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक विरुद्ध विरोधक आणि सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी असा सामना रंगण्याचीच चिन्हं आहेत. कारण, शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग यावरून शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, हे पाहावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk

“आरक्षणावर MIM चे दोन आमदार ५ वर्षे गप्प का होते?”; काँग्रेसचा सवाल

News Desk

राज्यात गेला महिनाभर सुरु ‘कोरोना’चा हाहाकार

News Desk