HW News Marathi
महाराष्ट्र

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून रूपै एटीएम कार्डचे 8 मे पासून वितरण

उत्तम बाबळे

नांदेड – केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार बँकेच्या रोख-रहीत व्यवहार करण्यासंबंधी महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांच्याकडून सर्व खातेदारांना रुपे डेबिट एटीएम कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण ६३ शाखेमार्फत सोमवार ८ मे ते शनिवार २० मे २०१७ पर्यंत गावनिहाय मेळावे घेऊन एटीएम कार्ड वितरीत केले जाणार आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खातेदारांना एटीएम कार्डवर व्यवहार करणे आवश्यक आहे. एटीएम कार्डवर व्यवहार केल्यावरच त्यांना एक लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये एटीएम कार्ड वापरण्यासंबंधी माहिती व सूचना बँकेमार्फत देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री जनधन खातेधारकांनी आपले एटीएम कार्ड घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी आपल्या शाखेशी किंवा बँक प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समृद्धी महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंची इलेक्ट्रिक कार मधून पाहणी

Aprna

संपत्तीसाठी भावांकडून वडील विजय शिवतारेंचा मानसिक छळ, मुलगी ममता शिवदीप लांडेंचा आरोप 

News Desk

“मी गायब होणारा नेता नाही”, मुंबै बँक घोटाळ्याच्या आरोपांवरुन दरेकरांनी विरोधकांना ठणकावलं

News Desk