HW News Marathi
महाराष्ट्र

तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात                                                       

उत्तम बाबळे

नांदेड – महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअतंर्गत मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देऊन ही योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका गुरुवार १५ जून २०१७ पर्यंत पाठवाव्यात , असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रुपये २५ हजार, द्वितीय पुरस्कार रुपये १५ हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये १० हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी २ मे २०१६ ते १ मे २०१७ या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मुल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तभंलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, ब, क वर्गवारीतील वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.

एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल.

नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, विसावानगर, नांदेड- ४३१६०२ (दूरध्वनी क्र. ०२४६२ – २५०१३७ ) यांचेकडे गुरुवार १५ जून २०१७ पर्यंत पाठवाव्यात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk

महाराष्ट्रातील ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’

News Desk

हरणाच्या मटनाची अवैध विक्री

News Desk