HW News Marathi
महाराष्ट्र

दलित महिला बलात्कार प्रकरणी नुसत्याच भेटी

विनोद तायडे

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मोठेगावाला दलित महिला बलात्कार जळीत हत्याकांडाने कलंक लावला. पाशवी कृत्य करणाऱ्या नराधामाला पोलिसांनी 1 महिना अभय दिल्याने पोलिसांची लक्तरे वेशीला टांगण्याचे काम खुद्द तपास पोलीस अधिकाऱयांनी केले असल्याचा आरोप मृतक महिलेच्या पित्याने केला. मोठेगावाला प्रत्यक्ष भेट दिल्या नंतर बर्याच गोष्टीचा उलगडा झाला . बौद्धावर सतत अन्याय होत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य सी एल थुल यांच्या समोर आली. येथील बौद्ध वस्तीत पाणी, रस्ते ,विकास कामे हेतुपुरस्कार केली नसल्याची बाब समोर आली.काही वर्षाआधी गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला निळा ध्वज विकृत लोकांनी फाडून टाकला त्यावेळी गावातील लोकांनी एकत्रित येत सदर प्रकरणावर पडदा टाकला. येथील बौद्ध समाजाचा सरपंच झाल्याने काही विकृत लोकांनी त्याना खोट्या प्रकरणात अडकवून त्याचे सरपंच पद धोक्यात आणले .आधी बाबी आयोगासमोरच स्पस्ट झाल्या. पोलीस विभागही काही बड्या नेत्याच्या दबावाखाली असल्याचे समोर आले आहे. गावातील 35 वर्षांय विवाहित महिला मुंबईवरून कामानिमित्त माहेरी मोठेगावाला आली. गावातीलच रणजित देशमुखसह 6 नराधमांनी दि 7 फेब्रुवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास हातपाय बांधून महिलेवर बलात्कार करत तिला जिवंत पेटवून देण्याचा थरार घडला. 65 टक्के जळालेल्या महिलेनी आरोडा ओरडा केल्याने शेजार्यानी तिला वाचविले .रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता तेथील ठाणेदाराने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला . पीडितेला पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय रुग्नालायत दाखल करण्यात आले . काही गावपुढाऱयांच्या मदतीने तक्रार दाखल करण्यात आली.तब्बल 5 दिवसांनी 12 फेब्रुवारीला पोलिसांनी रणजित देशमुख विरोधात 307,354,अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हाची नोंद केली .गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी आरोपिला अटक केली नाही .1 महिना आरोपी उजळ माथ्याने फिरत राहला.पीडितेच्या वडिलांनी 6 नराधमाने बलात्कार केल्याची फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यानी पीडितालाच व्यभिचारी ठरवून पित्याचा अपमान केला .पीडितेचा मृत्यूपूर्व जबानीत तफावत नोंदवल्या गेली .पीडितेला त्रास असाह्य झाल्याने तीला दि 5 मार्चला मोठेगाव ला आणण्यात आले.

6 मार्च ला दुपारी 4 वाजता पीडितेचा मृत्यू झा्ला आणि प्रकरणाने पेट घेतला. सदर घटनेची माहिती बसपा नेते संदीप ताजने ,अविनाश वानखडे यांना होताचा त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला मृतक महिलेच्या पित्याने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली. सदर प्रकारणाने सोशल मीडियावर पेट घेतला आणि पोलिसांनी झोपेतून जागृत होत कार्यवाहिस प्रारंभ केला. रिसोड शहरासह मोठेगाव ला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले. पोलीस अधिकारी डेरेदाखल झाले .8 मार्चला पिडीतेच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम पोलीस बंदोबस्तात करण्यात आले . दुपारी मोठेगाव येथे पोलीस बंदोबस्तातच अंतिम संस्कार पार पडले .अवघ्या 4 तासात घटनेतील आरोपी रणजित देशमुख याला हिंगोली येथून अटक करण्यात आली . वार्ता वार्यासारखी महाराष्ट्रभर पोहचली आणि निषेध आंदोलनास सुरुवात झाली वाशिम येथे बसपाच्या वतीने 17 मार्च ला निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीजमाती आयोग अध्यक्ष व सदस्य वरीस्ट अधिकार्यासह मोठेगावात दाखल झाले . पीडितेच्या 14 वर्षीय व 12 वर्षीय मुलाच्या नावाने समाज कल्याण विभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 2 लाख साडे बारा हजाराचा चेक देण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दि 15 मार्चला मोठेगावाला भेट दिली पीडितेच्या आई वडील नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. आंबेडकर यांनी आरोपी विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली .

भारिप बहुजन महासंघाचे जिल्ह्याध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी पीडित मृतक महिलेच्या 12 वर्षीय मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. कारंजा नगर परिषदचे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनीे सदनशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

आजही मोठेगावत तणाव पूर्ण शांतता आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहेमोठेगाव प्रकरणाने पुन्हा एकदा जातीवाद समोर आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

News Desk

पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल !

News Desk

जालन्यात मराठा समाजाचे आमदार, खासदारांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन

News Desk