HW News Marathi
महाराष्ट्र

दवाखाना इमारतीवर जिल्हा परिषद उमेदवाराचे जाहिराती

विनोद तायडे

वाशिम जिल्ह्यातील मेडशी सर्कल मध्ये शासनाच्या विकास कामावर कामाचा तपशिल फलक लावणे अनिवार्य असताना एका प्रसिद्धी पिसाट जिल्हा परिषद सद्सयाने कामाचे श्रेय घेण्याच्या नांदात चक्क स्वताचा फोटो सह भव्य बॅनर लावून शासनासह जनतेची दिशाभूल चालविली असताना प्रशासन मात्र कार्यवाही न करता ढिम्म बसले असल्याने खुद्द जिल्हा जिल्हा परिषद सदस्यांने जिल्हा परिषद च लक्तरेे वेशीवर टांगण्याचे काम चालविले आहे.

मेडशी येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातून प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशस्त आधुनिक इमारतीसाठी 4 कोटी 22 हजाराचा निधी मंजूर करण्यात आला .यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ हर्षदाताई दिलीप देशमुख यांनी पाठपुरवठा केला. प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडण्यात येऊन नवीन इमारत बांधकामास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. त्यासाठी शासनाकडून 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर बांधकामावर शासन नियमानुसार बांधकामाचा तपशील,निधी,काम सुरु करून बांधकामाला लागणारा कालावधी बाबत माहिती फलक लावणे अनिवार्य असताना कंत्राटदाराने शासन आदेशाची पायमल्ली केली तर दुसरी कडे एका जिल्हा परिषद सद्सयाने सदर कामाशी कसल्याही प्रकारचा संबंध नसताना श्रेय लागण्याच्या नांदात आपणच निधी खेचून आणल्याचा देखावा करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नामफलकावर स्वताचा फोटो असलेले बॅनर छापत जनतेची दिशाभूल चालविली आहे. अनेक विकास निधी खेचून आणल्याचे दाखवत जिल्हा परिषद सद्सयाने कोटी रुपयांच्या नावाखाली 20 टक्के कमिशन कंत्रातदारावून घेतले असल्याची माहिती मिळाली आहे .मेडशी भागात आतापर्यंत झालेल्या विकास कामाचा दर्जा तपासल्यास बराच भ्रष्टयाचार बाहेर निघु शकत असल्याची काही जाणकारांनी माहिती दिली आहे .एका जिल्हा परिषद सद्सयाने केवळ कमिशनवर स्वताच्या खेडे गावात करोडो रुपयांचा बंगला उभारणीचे काम हाती घेतले असून त्याचे काम हि अंतिम टप्प्यात आहे.रस्ते ,पूल व इतर काम नित्कृस्ट दर्जाचे झाले असून सिमेंट रस्ते एकाच महिन्यात गायब झाल्याने कामाचा दर्जा लक्षात येतो.

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नाम फलंकावर जिल्हा परिषद सद्सयाने अनधिकृतपणे स्वताचे नाव व फोटो चे मोठे बॅनर लावून विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने जनतेची दिशाभुल झालेली आहे तरी वरीस्ट अधिकाऱयांनी प्रसिद्धी पिसाट जिल्हा परिषद सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्वरित अनधिकृत फलक काढावा अशी जनतेची मागणी आहे याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉ ससे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर काम कोणाच्या प्रयत्नातून मंजूर झाले नसून शासनानेच ते काम मंजूर केले आहे,. कामावर श्रेय घेणारा फलक लावण्यात आला असेल तर तो अनधिकृत आहे याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बॅनर हटविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात कायदा टिकवला – आशिष शेलार

News Desk

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर अतुल भातखळकरांची खोचक टीका

News Desk

कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील, असा लेखी प्रस्ताव द्या – दानवे

News Desk