HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडमध्ये ३० एप्रिलला एचआयव्ही बाधित मुलांचा “हॅप्पी म्युझिक शो”

उत्तम बाबळे

नांदेड – लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथील सेवालयामधील हॅप्पी इंडियन व्हिलेज या प्रकल्पातील एच.आय.व्ही.संक्रमीत मुलांचा नांदेड शहरातील उडान फाऊंडेशन यांच्यावतीने दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुम नाट्यगृहामध्ये “हॅप्पी म्युझिक शो” या नृत्याविष्काराचे सादरीकरण होणार असून या सामाजिक उपक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एचआयव्ही बाधित मुलांसाठी समर्पित प्रा. रवी बापटले यांचे ‘सेवालय’ हे २००६ पासून त्यांच्यासाठी शाळा, त्यांचे पालकत्व, त्यांचे भवितव्य, लोकसहभागातून उभं करत आहेत. १८ वर्षाखालील निराधार मुलांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सदृढ समाजाने अप्रत्यक्ष नाकारलेल्या या दुर्दैवी मुलांनी स्वतः निधी उभारून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निश्चय केला आहे. यासाठी राज्यातील विविध शहरामध्ये “हॅप्पी म्युझिक शो” या नृत्याविष्काराचे स्नेहा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्क्रष्टरित्या सादरीकरण ही मुले करीत आहेत.

नांदेड शहरातील जास्तीत जास्त लोकांनी या सामाजिक उपक्रमास उपस्थित राहून एच.आय.व्ही. बाधित चिमुकल्यांना मदत करावी तसेच कार्यक्रमाच्या प्रवेशिकेसाठी ८४४६२२११८८ आणि ९९७५८९९९८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उडान फाऊंडेशन, नांदेड यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ स्थगित

News Desk

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य! – मुख्यमंत्री

Aprna

शिवसेना खासदार संजय राऊत उद्या दिल्लीला जाणार 

News Desk