उत्तम बाबळे
नांदेड :- इंटरनेट, सोशल मिडियाचे युगात दळण वळणाचे साधन म्हणून सरकारी पोस्ट ऑफिस आजही महत्व टिकून आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात पोस्टचे आॅफिसचे जाळे अधिक वाढविण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील दोन ठिकाणी नव्या पोस्ट ऑफिसची मान्यता मिळवून घेतली आहे. शासकिय कागदपत्रांची ये जा करने व सिमेवरील जवानांच्या पत्रांची पोहच आजही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनच होत असते.तर महिला बचत गट, कर्मचारी आणि नागरिकांचे मासिक बचत खाते, व शासनाच्या विविध योजनांचे अनुदानही याच खात्यामार्फत वितरित होत असते. त्यामुळे ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसला अनन्यसाधारण महत्व आहे. ही बाब लक्षात घेवून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ व नायगाव तालुक्यातील भोपाळा या दोन गावांमध्ये पोस्टऑफिस सुरु करण्यासाठीची मागणी केंद्रीय दळण वळण मंत्रालयास केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.