HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई महापालिकेला 681 कोटी रूपयांना फसवणा-या पालिकेच्याच कर संकलकासह 2 कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल

अजय कल्याणे

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेचा मुख्य कर संकलक, निर्धारक प्रकाश कुलकर्णी, लेखापाल दिनेश गवारी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर किशोर ढोले या तिघांनी कॉम्प्युटरचा गैवापर करून महापालिकेची 681 कोटी 65 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश कुलकर्णी हे मुख्य कर निर्धारक व संकलक असून मनपा हद्दीतील सर्व मालमत्ताची बिले बनून , प्रिंट करून त्याचे वितरण व कर वसुल करण्याची मुख्य जबाबदारी असताना, त्यांनी ढोले व गवारी यांचेशी संगण मत करून संगणक प्रणाली मध्ये बदल घडवून 3301 एल यू सि मालमत्ताची बिल प्रिंट होणार नाहीत व त्यांची नावे defaulter च्या यादीत येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली त्यामुळे मनपा चे 681.65 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्या मालमत्ता धारकांना तेव्हढा आर्थिक फायदा घडवून आणला आहे . तसेच18 मालमत्ताची वॉर्ड ऑफिस मधून आलेल्या twr रिपोर्ट मधील करपात्र मूल्यात बदल करून कमी मूल्य संगणक मध्ये नोंद केले आहे त्यामुळे मालमत्ता धारकाला फायदा व मनपा ला नुकसान घडवून आणले आहे. काही मालमत्ता ची कराची थकबाकी असतानाही त्यांना चुकीच्या पद्धतीने ना देय प्रमाणपत्रे दिली आहेत तसेच एकाच मालमत्तेची एकाच कालावधीची डुप्लिकेट बिले बनविली आहेत त्यामधून गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले आहे. अशा प्रकारे सार्वजनिक हिताकडे दुर्लक्ष करून मालमत्ता धारकांना आर्थिक फायदा घडवून आणल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकल मराठा समाजातर्फे उद्या मुंबई बंद

News Desk

तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार, गोपीचंद पडळकर थेट सोनिया गांधींकडे करणार तक्रार

News Desk

कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक

News Desk