HW News Marathi
महाराष्ट्र

पीक विमा योजनेवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मुदतवाढीची मागणी
मुंबई: पीक विमा योजनेसाठी पैसे भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख असली तरी तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप लाखो शेतकरी रांगेत उभे असून, राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलून या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावून धरली. या मुद्यावर विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले होते.?विरोधी पक्षांनी याबाबत आज स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, पीक विमा योजनेकरिता आॅनलाइन अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.? कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट बंद असल्यामुळे शेतक?्यांवर दोन-दोन दिवस कामे सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ ओढवली आहे. ?यातून निर्माण झालेल्या तणावामुळे राज्यात दोन शेतक?्यांचा रांगेत उभे असताना मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील शेतक?्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, राज्य सरकारने आजच्या आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राकडे घेऊन जावे आणि केंद्र सरकारला राज्याची परिस्थिती विषद करून पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळवावी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली.

या मागणीसंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. सोमवारी सायंकाळपर्यंत पीक विमा योजनेकरिता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. परंतु, तसे न झाल्यास तातडीने केंद्र सरकारकडे जाऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर हल्ला

News Desk

पंतप्रधान मोदींना अनेकवेळा हरवणारा नेता शरद पवारांच्या भेटीला!

News Desk

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत – नाना पटोले

News Desk