HW News Marathi
महाराष्ट्र

पाचशे बाळंतपण करणाऱ्या जळूबाई वाघमोडे यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळी निधन

उत्तम बाबळे

नांदेड :- नंदुर ता.देगलूर येथील रहिवासी असलेल्या व

तब्बल पाचशे विवाहितांचे बाळंतपण सुखरुपपणे पार पाडणाऱ्या जळूबाई गंगाराम वाघमोडे (१०५) यांचे ४ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.जळूबाई वाघमोडे या ग्रामीण भागातल्या असल्या तरी त्या आयुर्वेद विद्येबाबत निष्णात होत्या. त्यांनी आपल्या हयातीत जवळपास पाचशेहून अधिक विवाहितांचे बाळंतपण सुखरुपपणे पार पाडले.त्यामुळे आजच्या आधुनिक युगात मोठमोठी रुग्णालये,हाॅस्पीटल्स व अत्त्यावध आरोग्य सेवा सर्वत्र उपलब्ध असतांनाही त्या अनेक महिलांना हव्याहव्याशा वाटायच्या.पंचक्रोषीत निस्वार्थ सेवा करणा-या दायीमा म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. नंदूरमधील राहत्या घरी त्यांचे वृध्दापकाळाने वयाच्या तब्बल १०५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली,सुना,नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे़ कुंडलवाडी येथील मिलिंद विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एऩ.जी़.वाघमोडे यांच्या त्या आई होत तर पत्रकार कुलदीप नंदूरकर यांच्या आजी आहेत. त्यांच्या पार्थिवावर ५ मे रोजी दुपारी १२:०० वाजता नंदूर-ता़.देगलूर येथे अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं आज निलंबन?

News Desk

महाराष्ट्रातील ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’

News Desk