HW News Marathi
महाराष्ट्र

पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू 

उत्तम बाबळे

नांदेड – भोकर तालुक्याती मौ. जांभळी येथील काही विद्यार्थी एका शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता एका १३ वर्षीय विद्यार्थीनीचा पाय घसरुन ती विहिरीत पडली व तिला वाचविण्यासाठी विहिरीत उतरलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी अन्य एक १२ वर्षाचा विद्यार्थी अशा दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू २ जून रोजी झाला असून भोकर पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मौ.जांभळी ता.भोकर जि.नांदेड येथील काही विद्यार्थी सुट्ट्या असल्याने २ जून रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास श्यामराव गुंडप्पा कुंचलवाड रा.जांभळी यांच्या गावा शेजारील शेतात खेळण्यासाठी व झाडाचे गावरान कच्चे आंबे आणि पाड खाण्यासाठी गेले.काही वेळाने ८:०० वाजताच्या दरम्यान त्यांना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्याच शेतातील विहिरीवर गेले असता त्या विद्यार्थ्यांपैकी कु.मनिषा हरी राठोड (१३) रा.जांभळी हिचा पाय घसरला व ती त्या विहिरीत पडली. यावेळी तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी अन्य ४ विद्यार्थी त्या विहीरीत उतरले.परंतू पाणी भरपुर असल्याने व किती खोल आहे याचा अंदाज त्या सर्वांना न आल्याने त्या सर्वांना तिला बाहेर काढणे अशक्य झाले.तसेच स्वत:चा बचाव करत तिला कसे बाहेर काढावे हे त्यांना समजनासे झाले.यातच पोहता येत नसलेला शिवदर्शन श्यामराव कुंचलवाड (१२) रा.जांभळी हा विद्यार्थी देखील पाण्यात बुडाला.दरम्यानच्या काळात त्यांना वाचविण्यासाठी अन्य कोणाचीही मदतषन मिळाल्याने कु.मनिषा व शिवदर्शन या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.उर्हेवरीत दोघे सुदैवाने बचावले व त्यांनी माहिती गावाकडे दिली.हे समजताच त्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक व गावकरी घटनास्थळी त्यांना वाचविण्यासाठी आणि मदतीसाठी धाऊन गेले.परंतू तो पर्यंत त्यां दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे समजल्यावरुन पो.नि.संदिपान शेळके व सहाय्यक पो.उप.नि.सय्यद मुनिरोद्दीन यांनी घटनास्थळी भेट दिली आणि रितसर पंचनामा केला आहे.या प्रकरणी रामसिंग आमला राठोड (५५) रा.जांभळी यांनी फिर्याद दिल्यावरुन भोकर पोलीसांत आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पो.उप.नि.सय्यद मुनिराद्दीन हे करत आहेत.शाळा सुरु होण्यास अवघे काहीच दिवस उरले होते व अशात या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय?

News Desk

“महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे ? की एका बबड्याच्या फायद्याचं?”

News Desk

पुतळ्याऐवजी युवक युवतींसाठी सैनिक शाळा सुरु करा खासदार इम्तियाझ जलील यांची मागणी

News Desk