HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा एकदा लोकल रेल्वे टार्गेट : रेल्वे पोलिस सतर्क

मुंबई लोकल रेल्वे मार्गावर घातपात होण्याची शक्यता विशेष शाखेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे रुळालगत असलेली पोलिस ठाणे आणि रेल्वे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी दुपारी विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या एटीसी पथकाला गुप्त माहितीदाराकडून या घातपाताच्या शक्यतेविषयी माहिती मिळाली. त्यानुसार विनोबा भावे पोलिस ठाण्यातून ही माहिती विशेष शाखेला देण्यात आली. या माहितीत १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला (प) ते हार्बर लोकल रेल्वे लाइन परिसरात रेल्वे रुळांवर घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल रेल्वे आणि मुंबई पोलिसांनी घेतली आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमवीर सिंग यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करा !

News Desk

डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले कराल, तर लष्कराच्या मदतीची वेळ येऊ नका !

swarit

व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये केला समावेश

Aprna