HW News Marathi
महाराष्ट्र

पहाटे तीनपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत रांगेत उभा होता..

शासनाच्या चुकीच्या धोरणाने घेतला शेतकऱ्याचा बळी

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर तालुक्यातील मौजे दिवशी (बु) येथील एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा सरकारच्या चुकीच्या धोरणामुले हाकनाक बळी गेला. किनी येथील एसबीआय बँक शाखेत पिक विमा भरण्यासाठी हा शेतकरी गेला असता चक्कर येऊन कोसळला व त्यात त्यात त्याचा मृत्यू झाला.

पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठी दिवशी (बु) येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश उर्फ रामा लक्ष्मण पोतरे ( ३५ ) हा शनीवार, २९ जुलै रोजी पहाटे ३:३० वाजता किनी येथील एस.बी.आय बँकेत.गेला व आपला नंबर लवकर लागावा म्हणून बँकेसमोर रांगेत बसला. पीक विमा भरण्यासाठी रात्री पासूनच तेथे अनेक शेतकरी बसले होते. भरपूर गर्दी असल्याने तो सकाळी ८ वाजल्यापासून रांगेत उभा होता. बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली यात दुपारी २ वाजता रामा पोतरे यास रांगेतच घाम येवून चक्कर आल्याने तो बँकेच्या पायरीवर कोसळला. काही लोकांनी त्यांना तात्काळ किनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी भोकर येथे जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यावरून त्यास भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैधकिय अधिकारी डॉ. संजय पोहरे यांनी त्यास मयत झाल्याचे घोषीत केले.

मयत शेतकरी रामा पोतरे यास दिवशी (बु) येथे गट क्रं.११८ मध्ये (०.८० हे.आर.) दोन एकर शेती असून तो मागील तीन दिवसांपासून बँकेत पीक विमा भरण्यासाठी बँकेच्या चकरा मारीत होता. शेतात त्याने सोयाबीनची पेरणी केली होती. त्या पीकाचा विमा भरण्यासाठी तो बँकेत करत होता. मयतास वृद्व आई, वडील, पत्नी आणि ९ वर्षाची दोन जुळे मुलगा व मुलगी आहेत.

किनी येथील बँकेत रामाला चक्कर आल्यानंतर त्याचे मित्र दत्तात्रय ताटेवाड, महेश लकमवाड, आनंद गाडेकर, गंगारेड्डी सुरकुंटवाड, अंकुश सलावाड यांनी त्यास उपचारासाठी दवाखान्यात आणले.या घटनेची माहिती कळताच तहसीलदार व्यंकटेश मुंडे, ना.तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके, काँग्रेस तालुका अध्यक्ष जगदिश पाटील भोसीकर, आ.अमिता चव्हाण यांचे स्वियसहायक मुंगल व पतंगे सह शिवसेना तालुका प्रमुख सतीष देशमुख, बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे, भाजपाचे किशोर पाटील लगळूदकर,रा.काँ.पार्टीचे जि.उपाध्यक्ष डाॅ.फेरोज इनामदार,जिल्हा संघटक जवाजोद्दीन बरबडेकर यांनी दवाखान्यात मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली.तसेच उपविभागीय अधिकारी साै.दीपाली मोतीयेळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी भेट दिली.

दरम्यान मयताची आर्थीक परिस्थिती पाहता मयताच्या कुटुंबीयांस शासनाची मदत मिळनार नाही तो पर्यंत मयताचे पीएम होवू देणार नाही असी सामाजिक कार्यकर्त्यांनी व नातेवाईकांनी भुमीका घेतली होती. रात्रीचे १०:०० वाजता पर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या गरीब शेतक-याचा निष्पाप बळी गेला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून रुग्णालयात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला आहे.

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा

Aprna

बेकायदा गर्भपात प्रकरणी रुग्णालयाचा परवाना रद्द

swarit

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk