HW News Marathi
महाराष्ट्र

बार्शी कृषी उत्पन बाजार समिती घोटाळा प्रकरणी संचालकासह १०१ जणांवर गुन्हा दाखल

बार्शी : येथील बार्शी उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील १८ संचालक व १०१ कर्मचाऱ्यांविरोधात अपहार व फसवणूकीचा गुन्हा बार्शी पोलिसांनी दाखल केला आहे.

जिल्हा विशेष लेखा परिक्षण अधिकारी व्ही. बी. डोके यांनीदाखल तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बाजार समितीच्या निधीत अपहार, जमिनीतील मिळणाऱ्या भाड्यामध्ये अपहार, नियमबाह्य कर्मचारी भरती, तसेच सुट्टीच्या दिवशी व गैरहजर कालावधीत कर्मचाऱ्यांचे वेतन देऊन अपहार करण्यात आल्याचे आरोप लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी केले आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल होताच बार्शी शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुका बंदची हाक दिली आहे. तर पोलिसांनी सर्वांना सहकार्य करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकरण

सन २०१५-१६ या कालावधीतील हा अपहार व गैरव्यवहार, अपहार : 18 लाख ४३ हजार रुपये, गैरव्यवहार : ८६.५७ लाख रुपये एकूण : १ कोटी ५ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

जातधर्मापलीकडे जाऊन कनक्यात साजरी झाली भाऊबीज

News Desk

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, फेरिवाला केवळ एक कारण, कल्पिता पिंपळेंचा खळबळजनक दावा

News Desk