HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे हेलीकाॅप्टर अपघातात चार जण जखमी  

उत्तम बाबळे

निलंगा :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे हेलीकाॅप्टर कोसळले.यात सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व हेलीकाॅप्टर मधील सर्वजण बचावले.परंतू ते निलंगा येथील ज्या मातंग वस्तीत कोसळले तेथील चार जण जखमी झाले असून एका घराचेही नुकसान झाले आहे. विशेष सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार असे की,निलंगा जि.लातूर येथील शिवाजी महाविद्यालय हे मानव वस्तीत आहे.असे असले तरी अनेक वर्षांपासून याच महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलीपॅड केल्या जाते व राज्य,केंद्र सरकारचे अनेक मंत्री,नेते याच प्रांगणातील हेलीपॅड वरुन हेलीकाॅप्टरने ये जा करतात.त्याच प्रकारे २५ मे रोजी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे या हेलीपॅडवर उतरले व कार्यक्रम आटोपून लातूरहून मुंबई ला जाण्यासाठी निघाले असता हेलीकाॅप्टर ५० ते ६० फुट अंतरावर उडाले.यावेळी हेलीकाॅप्टरमध्ये काही तांत्रीक बिघाड झाली.यामुळे ते उंच उडाण घेऊ शकले नाही.दरम्यान हेलीपॅड पासून ते २०० मिटर अंतरावर गेले असता त्या ठिकाणच्या मातंग वस्तीतील विद्युत तारेला पंखा अडकला व हेलीकाॅप्टर कोसळले.असे तेथील प्रत्यक्षदर्षींकडून चर्चील्या जात आहे. हेलीकाॅप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या जागेपासून अवघ्या १० ते १५ फुट अंतरावर उच्च दाबाचा विद्युत प्रवाह पुरवठा करणारे रोहित्र आहे.सुदैवाने त्यावर हे हेलीकाॅप्टर कोसळले नाही म्हणून मोठा अनर्थ टळला.हेलीकाॅप्टर फार उंचावरुन कोसळले नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,राज्याचे प्रधान सचिव प्रविण परदेशी ,स्विय सहाय्य अभिमन्यु पवार व दोन्ही पायलट बालंबाल बचावले.विद्युत तारा तुटल्याने प्रवाह वाहत असलेल्या तारा काही घरांवर पडल्या यात परंतू हेलीकाॅप्टर कोसळलेल्या मातंग वस्तीतील शेख सिराज अब्दुल रशीद वय (२२), ,सौ.सुक्षा भरत कांबळे (४५), भरत मारोती कांबळे (५०) व श्रावण प्रभु बोयने (२२) रा. येळनूर वय हे जखमी झाले.तर अनेक जण किरकोळ जखमी झाले. या सर्वांवर उप जिल्हा रुग्णालय, निलंगा येथे उपचार चालू आहेत.तसेच हेलीकाॅप्टर कोसळल्याने भरत मारोती कांबळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.हेलीकाॅप्टर पाहण्यासाठी मातंग वस्तीतील लोक घराबाहेर होते म्हणून तुटलेल्या तारेतील विजेचा धक्का कोणासही लागला नसल्याने सुदैवाने काही अघटीत घडले नाही.म्हणून यापुढे असे हेलीपॅड मानवी वस्तीपासून काही दुरच्या अंतरावर करावीत अशी मागणी मातंग वस्तीतील नागरीकांसह अनेक जणांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ऐन गणेशोत्सवात जमावबंदीचा आदेश!

Jui Jadhav

धीर सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची भावूक पोस्ट

News Desk

आज भाजपची पहिली यादी जाहीर होणार ?

News Desk