HW News Marathi
महाराष्ट्र

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

गौतम वाघ

उल्हासनगर : पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याण तालुक्यातल्या द्वारली गावात घडलीये. धक्कदायक बाब म्हणजे बलात्कार करणारे दोन्ही आरोपी मुंबईच्या बेस्ट बसचे चालक असून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी असून हे दोघंही पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. यापैकी सुनील मोरे याच्याकडे पीडित महिलेच्या पतीनं १० हजार रुपये उसने मागितले होते. हे पैसे घेण्यासाठी मोरे यानं मित्राच्या बायकोला बुधवारी त्याच्या द्वारली पाड्यातील घरी बोलावलं आणि तिथे तिच्यावर मोरेसह अरविंद कुंभारनेही बलात्कार केला. या सगळ्या प्रकाराचं त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केलं. यानंतर पीडितेनं शुक्रवारी अरविंद कुंभार याचा हा मोबाईल मिळवला आणि थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री म्हणून टिकून राहण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर कोणते पर्याय आहेत ?

News Desk

सचिन वाझेला सेवेत रुजू करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीची मुंबई पोलिसांनी माहिती द्या

News Desk

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर! – मुख्यमंत्री

Aprna
महाराष्ट्र

भाजप नेते कुलदिपसिंह ठाकूर यांच्या ‘कन्यादान’ पोस्टला प्रचंड प्रतिसाद

News Desk

पी. रामदास

लातूर – लातूरच्या शीतल वायाळ या तरूणीच्या आत्महत्येनं संपूर्ण राज्य सून्न झालं होतं. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, लातूरच्या राजकारणातील धडाडीचं नेतृत्व असलेल्या भाजपच्या कुलदीपसिंह ठाकूर यांच्या ‘कन्यादान’ वरील एका फेसबुक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हाट्स अपच्या हजारो ग्रुपमध्येही भाजप नेते ठाकूर यांची ती पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेयं… ज्या कारणासाठी ही पोस्ट होती, त्या मुलीच्या लग्नासाठी अनेकांनी पोस्ट वाचून मदत द्यायला सुरूवात केली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील मोहनाळ इथल्या राम फुलारी यांची मुलगी सोनालीचा विवाह नांदेड जिल्ह्यातल्या अभिजीत फुलारी यांच्याशी 18 मे रोजी होतोय. लग्नाचा अर्धा खर्च मुलीचे मामा नागनाथ फुलारी करत असून उर्वरित खर्चासाठी भाजप नेते कुलदीपसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोशल मीडियावर खालील पोस्ट टाकली आहे. ठाकूर हे या लग्नासाठी वैयक्तिक मदतही करणार आहेत. त्यांनी पोस्ट केलेली पोस्ट जशीच्या तशी खाली देत आहोत…

कुलदीपसिंह ठाकूर, नेते, भाजप, लातूर यांची फेसबुक पोस्ट …

“चला करू या कन्यादान,

एक विनम्र आवाहन”

“पुन्हा एखादी शीतल वायाळ जाण हि आमच्या असण्याच्या,

व सद्य समाजव्यवस्थेच्या गालावर सणसणीत चपराक बसण्यापूर्वीच,

अन् जीव गेल्यानंतर मदत करून मोठेपणा व बातम्या येण्यापेक्षा चला त्यापूर्वीच शक्य ती मदत करू…!

कु. सोनाली राम फुलारी रा.मोहनाळ ता.चाकुर या ऊपवर मुलीचे चि.अभिजीत अरूण फुलारी रा.वसमत जि.नांदेड यांचेशी लग्न जमले असून दि. १८मे.२०१७ रोजी विवाह मुहुर्तावरसंपन्न होणार आहे.

तिचे कुटूबिय अक्षरश: मोलमजूरी करणारे असल्याने आर्थिक परस्थिती अत्यंत हलाखीची आहे.म्हणून लग्नाचा अर्धा आर्थिक भार तिचे मामा श्री.नागनाथ फुलारी करीत आहे….व त्यांना बाकीचा खर्च भागविण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे…! आपण व आपल्यांकडुन आर्थिक सहकार्याची अपेक्षा.

चला आपण सारे मिळून भाऊ,दादा,मामा-मामी,

काका-काकू बनून हे “कन्यादान” पार पाडू,

मी माझ्याकडून शक्य ते सहकार्य केले आहे !आपणही आपला वाटा ऊचलावा हे विनम्र “आवाहन”!

आपला विनम्र !

ठाकूर कूलदिपसिंह ना.

संपर्क:-नागनाथ फुलारी

मोबाईल नं.9730545844

 

Related posts

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूसंख्येत होणारी वाढ चिंताजनक !

News Desk

वेळ पडली तर सरकार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्जही काढेल !

News Desk

मी गद्दार नाही, शिवसेनेचा खरा गद्दार अनिल परब आहे!; रामदास कदमांचा सवाल

Aprna