HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मध्यावधीची शक्यता कमी- अजित पवार

पुणे: माझ्या २५ वर्षांचा राजकीय अनुभव सांगतो की राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचे कोणतेही संकेत या सरकारकडच्या कारभारावरून दिसत नसल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. शिवसेना-भाजप गुळाला मुंगळा चिकटल्याप्रमाणे सत्तेला चिकटून असल्याची टीकाही त्यांनी केली. दोन्ही पक्षातील वाद देखील केवळ देखावा असल्याचे पवार म्हणाले.

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बिबवेवाडी येथिल अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे पार पडली. त्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता येऊन तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. सत्तेत सहभागी असणाºया शिवसेनेकडून अनेक वेळा राजीनामा देण्याची भाषा करण्यात आली. आमचे राजीनामे खिशात आहे, तर ते गेले कुठे असा सवाल उपस्थित करित हे दोन्ही पक्ष सत्तेपासून राहू शकत नाहीत, अशा शब्दांत युतीवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, या सरकारने बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आता भविष्यात महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील जनतेमधून निवडा, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. हे निर्णय पुढील परिणाम लक्षात न घेता घेतले जात असून त्याचे परिणाम विकास कामावर होण्याची भितीही योवेळी पवार यांनी केली. या त्यांच्या कार्यपद्धतीवरून आपल्या राज्याची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे की काय अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली.

मुंबईत हवेत शेती करतात काय?

राज्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील ९० लाख शेतकºयांना झाला पाहिजे. जिल्हा निहाय आकडेवारी सादर करण्याची गरज असून नुकतीच काही आकडेवारी समोर आली. त्यामध्ये मुंबईमध्ये देखील शेती करतात, असे म्हटले आहे. वस्तू स्थिती लक्षात घेता १०० फूट जागा राहण्यास नाही. तर मुंबईत शेतकरी आले कुठून, येथे शेती हवेत करतात का? असा सवाल करीत त्यांनी सरकारच्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून राज्यातील नाट्यगृह खुली; अजित पवार म्हणाले, “किती वेळा वाजवायची…”

News Desk

थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार 

News Desk

धरणे आंदोलन करणाऱ्या गर्भवती महिलेची आंदोलन स्थळी प्रसूती; प्रशासनाची डोळेझाक

Aprna