HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा सुरू  मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी 

भोपाळ (वृत्तसंस्था) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह २५ राज्यातले शेतकरी सहभागी झाले आहे. तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी शेतकरी संघर्ष समितीचे स्थानिक नेते आणि माजी आमदार डॉ. सुनिलम यांना अटक केली आहे. सध्या इथं ६०० पोलिसांचा बंदोबस्त आहे.

शेती मालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींनी किसान मुक्ती यात्रा काढली आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहणार आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर १८ जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकºयांनी एकत्र यावे असे आवाहन खासदार राजू शेट्टींनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार

News Desk

“किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी”, संभाजीराजे झाले आक्रमक

News Desk

सांगलीत निवडणूकीची रणधुमाळी होणार सुरू भाजपला सत्ता टिकवण्यासाठी करावी लागणार धावाधाव

News Desk