HW News Marathi
महाराष्ट्र

रेल्वेच्या बोगीतील शौचालयाच्या जागी कॅटरिंगचे सामान

फाइल फोटो

मुंबई – रेल्वे प्रशासनाने प्रत्येक डब्यातील एक शौचालय कमी करण्याचा निर्णय घेतला असून गर्दीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करताना त्यामुळेगैरसो होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या शौचालयाच्या जागेवर आता कॅरिंगचे सामान ठेवण्यात येणार आहे.

ट्रेनमधील गर्दी पाहाता बोगीतील शौचालयाची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र रेल्वेने शौचालय कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे प्रवासी संघटनेने रेल्वेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ट्रेनच्या प्रत्येक बोगीमध्ये समोरासमोर २ याप्रमाणे ४ शौचालयाची व्यवस्था असते. त्यातील एक शौचालय काढून त्याठिकाणी केटरींगचे सामान ठेवण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना ठराविक अंतरावर खानपानाची सुविधा पुरवण्यात येते. त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक बोगीत खाद्यपदार्थ घेऊन यावे लागते. परंतु बोगीत खाद्यपदार्थांचे सामान, जेवणाच्या ताटा ठेवायला जागा नसल्याने हे सामान दरवाजाजवळ उघड्यावरच ठेवले जाते. स्वच्छता आणि प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे घातक असल्याने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ४० हजार बोगींमधून प्रत्येकी एक शौचालय हटविण्यात येईल. या बोगींचे रिडिझाईन करण्यात येईल. या कामासाठी रेल्वे प्रशासन स्पेन आणि चीनच्या इंजिनीअर्सची मदत देखील घेणार आहे.

रेल्वे प्रशासनाने १३ जूनपासून मिशन रेट्रो फिटमेंट अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत जुने आयसीएफ डिझाईनचे डबे आधुनिक आणि सुरक्षित बनवले जात आहेत. यापूर्वी रेल्वेच्या रिझर्व्ह क्लासच्या बोगींमध्येच २ शौचालये असायची. त्यानंतर १९७० मध्ये तत्कालीन सुधार समितीच्या सल्ल्यानंतर प्रत्येक बोगीत प्रत्येकी ४ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही !

News Desk

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

नाशिकच्या कांद्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले

News Desk