HW News Marathi
महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी सात पं.स.मध्ये भाजपची सत्ता  

 

लातूर – लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी मंगळवारी झाल्या. त्या १० पैकी ७ पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर ३ पंचायत समितीत काँग्रेस पक्षाचे सभापती झाले आहेत. औसा पंचायत समितीमध्ये काँग्रेसला मनसेने साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेचा उपसभापती झाला आहे. लातूर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसने सभापती व उपसभापतीपद मिळविले आहे.

पंचायत समिती निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भाजपने भरघोस यश संपादन केले. ७ पंचायत समितीत निर्विवादपणे वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे चाकूर, अहमदपूर, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर पंचायत समित्यांत भाजपाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर लातूर, औसा व जळकोट पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती झाले असून, औशात काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. मनसेच्या इंजिनने हाताला साथ दिल्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेला उपसभापती पद देण्यात आले आहे.

तालुकानिहाय भाजपाचे सभापती व उपसभापती…

निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदी अजित माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे,

शिरूर अनंतपाळ पं.स.च्या सभापतीपदी वर्षा भिक्का, उपसभापती डॉ. नरेश चलमले,

चाकूर- सभापती सुनीता डावरे, उपसभापती वसंत डिगोळे,

अहमदपूर- सभापती अयोध्याताई केंद्रे, उपसभापती मंगलाबाई खंदाडे,

रेणापूर- सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण

देवणी- सभापती सत्यवान कांबळे, उपसभापती शंकर पाटील,

उदगीर- सभापती सत्यकला गंभिरे, उपसभापती रामदास बेंबडे यांची निवड करण्यात आली.

लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या शीतल फुटाणे, उपसभापतीपदी दत्ता शिंदे,

जळकोट- सभापतीपदी व्यंकटराव केंद्रे, उपसभापती स्वाती केंद्रे.

औसा पं.स. सभापतीपदी काँग्रेसचे संजय कदम, तर उपसभापतीपदी मनसेच्या रेखाताई नागराळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीक विमा भरण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ द्या-अशोक चव्हाण

News Desk

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, सामनातून मोदींना सवाल

News Desk

मुस्लिमांना गीता, तर हिंदूंना कुराण भेट

News Desk