HW News Marathi
महाराष्ट्र

विक्रमी वेळेत सावित्रीचा पूल तयार

केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सावित्री पुलाचे उद्घाटन संपन्न

महाड – विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या 165 दिवसात सावित्री नदीवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तीनपदरी पुलाचं उद्दघाटन थोड्याच वेळापुर्वी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते उपस्थित होते. याबरोबरच मुंबई-गोवा महार्माच्या चौपदरीकरणाच्या 4 हजार कोटींच्या पुढील टप्प्याच्या कामाचं भूमीपूजनही नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कार्यक्रमास उपस्थित राहिलेले नाही.

2 ऑगस्ट 2016 रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीनं सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता.त्यात 42 जणांचे प्राण गेले होते.दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी घटनास्थळास भेट देऊन सहा महिन्यात पुलाचे काम पूर्ण कऱण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार 15 डिसेंबर2016 रोजी पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आणि विक्रमी वेळेत म्हणजे 31 मे 2017 रोजी पुलाचे काम पूर्ण झाले आहे.तीन पदरी असलेल्या या पुलाची रूंदी 16 मीटर असून पुलाची लांबी 239 मीटर एवढी आहे.अवघ्या 165 दिवसात काम पूर्ण झालेल्या या पुलासाठी 35.77 कोटी रूपये खर्च आलेला आहे.जुना पूल पडल्यानंतर अंधारामुळे काही दिसलं नाही आणि वाहनं सरळ नदीत पडली,याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुलावर रात्रीसाठी पथदीप सुविधा आणि पदपथ व्यवस्था केली गेली आहे.तसेच पूर गजर प्रणाली,गंजरोधक सळ्या,रस्ता सुरक्षा उपाययोजना,आदि अत्याधुनिक सुविधाही करण्यात आलेल्या आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्यादृष्टीने या पुलाचे अनन्यसाधाऱण महत्व आहे.त्यामुळं पावसाळ्यापुर्वी नवीन पूल वाहतुकीस खुला होत असल्याने पावसाळ्यात होणार्‍या वाहतूक कोंडीपासून कोकणवासियांची सुटका होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माणसाने लॅविश राहू नये का?”, भाजपच्या ‘त्या’ आरोपांना उर्जामंत्र्यांचे प्रत्युत्तर  

News Desk

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, कारण वाघाशी कधी दुश्मनी नव्हतीच!

News Desk

#CoronaVirus | आता शहरांतील झोपडपट्टी परिसरांतही ‘कोरोना’चा शिरकाव

News Desk