HW News Marathi
महाराष्ट्र

व्‍यवस्‍थेचे भाग होऊ नका व्‍यवस्‍था बदला : मुख्यमंत्री

नवनिर्वाचितभाजपा नगरसेवकांना मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍यासह मुंबईच्‍या टिमचे मुख्‍यमंत्र्यांकडून कौतूक

मुंबई मराठीभाषा दिना निमित्‍त समवारी दादर येथील वसंत स्‍मृती येथे भाजपाच्‍या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्‍यात आली. यावेळी मराठी भाषेचा प्रभावी वापर आणि त्‍याबाबतची पुस्‍तके याबाबत मराठी भाषेचे अभ्‍यासक शरदमणी मराठे यांनी मार्गदर्शन केले. तर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. तसेच महापालिकेत नविन निवडून आलेल्‍यांनी व्‍यवस्‍थेचे भाग होऊ नका तर व्‍यवस्‍था बदलण्‍याचा प्रयत्‍न करा, आपल्याला नवीन पारदर्शी व्यवस्था तयार करायची आहे, असे आवाहन केले.

भाजपाचे मुंबई अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कार्यक्रम घेण्‍यात आला. यावेळी मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, मराठी भाषा ही एक समृध्‍द भाषा असून आपल्या पैकी प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे. ज्या भाषेने विचार दिले, तत्व शिकवलं, 21 व्या शतकात हि भाषा तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे. जग भरात 12 कोटी पेक्षा अधिक लोक मराठी भाषा बोलतात याचा आपल्‍याला अभिमान आहे. या भाषेच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करू या असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले.

तर नव्‍या नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते म्‍हणाले की, हि वैचारिक लढाई, होती त्‍यासाठी आत्मविश्वास लागतो. तो आत्‍मविश्‍वास घेउन मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि त्‍यांच्‍या टिमने काम केले. त्‍यामुळेच आपल्‍याला यश मिळाले. हे यश सर्वांचे आहे. आपली लढाई सत्तेसाठी नाही, विचारांची आहे. विचारांच्या लढाईत सर्व एका दिशेने जातो तेव्हा मुंबईत दाखवून दिलं 31 जगणावरून 82 ला पोहचलो. माध्यमे दाखवत आहेत की सेना कशी कमी जागा हरली. पण आपला ग्राफ पहिला तर जनतेने मोठं समर्थन आपल्‍याला दिल आहे. आपल्‍याला 28.5% मत मिळाली आहेत.195 जागा लढवून आपण 82 जागा जिंकलो. तर 227 जागा सेनेनं लढवल्‍या. आपले मित्र पक्ष आपल्या चिन्‍हांवर लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असते. पण त्यांचे आभार कि ते आपल्याबरोबर होते खांद्याला खांदा लावून लढले. भाजपची अडीच तीन वर्षांनी वाटचाल पाहिलं तर कळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे बोलतात ते करून दाखवतात. मोदींनी कारभारात पारदर्शकता आणली, व्यवहारात पण आणली. प्रत्येक व्यवहारात पारदर्शकाता असावी असा टोकाचा आग्रह भाजपाने ठेवला. यातून देश बदलत आहे. आपण सेवा देणारी लोक आहोत व्यवस्थेची ताकद मोठी आहे. व्यवस्था नवीन व्यक्तीला गिळण्यासाठी तयार असते. नवीन व्यक्तीला कस लागतो. आपल्याला या व्यस्थेचा भाग व्हायचं नाही. आपल्याला नवीन पारदर्शी व्यवस्था तयार करायची आहे. पुढे काय होईल, पद मिळेल का चिंता करू नका. महत्वाचं हे आहे की आपण लोकांच्या विश्वासाला पात्र होतो की नाही. पक्ष शिस्त महत्वाची आहे. आता उत्सवाचं वतावारण संपलं पाहिजे, ज बाबदारीची जाणीव झाली पाहिजे. तुमच्‍यावर मोठी जबाबदारी आहे. भाजप गट मुंबईला वैभवशाली बनवेल, याचा मला विश्‍सास आहे. मुंबई म्हणजे केवळ उंच इमारती नाही, हि मुबई गरिबांची, माध्यवर्गीयांची आहे. या सर्वांसाठी आपल्‍याला काम करायचे आहे, असेही मुख्‍यमंत्र्यांनी नमुद केले.

यावेळी संघटनमंत्री सुनिल कर्जतकरयांच्‍यासह, मुंबईतील भाजपा आमदार अाणि पदधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… आज मराठी पत्रकार दिन का ? साजरा करतात

News Desk

१०वी-१२वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, विद्यार्थ्यांना अफवांना बळी न जाण्याचे आवाहन

News Desk

व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये केला समावेश

Aprna