HW News Marathi
महाराष्ट्र

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एसटी चालक प्यायला विष

औरंगाबाद – अधिकारी छळत असल्याचा आरोप करून एसटी महामंडळातील एका चालकाने सोमवारी दुपारी विष प्राशन केले. कामगार अधिकाऱ्यांनी या चालकाला वेळीच रुग्णालयात नेल्याने त्यांचे प्राण वाचले. विभाग नियंत्रक कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, संबंधित चालकाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांनी सांगितले आहे.

एसटी चालक भाऊसाहेब केशवराव ताठे (३२, रा. टीव्ही सेंटर) दुपारी साडेबाराच्या सुमारास विभाग विभाग नियंत्रक कार्यालयात आले. त्या वेळी तेथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपला होता. अधिकारी सभागृहातून दालनाकडे परत निघाले होते. कामगार विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ चालक ताठे उभे होते. कामगार अधिकारी एल. व्ही. गवारे दालनाकडे जात असताना ताठे यांनी त्यांची भेट घेतली. ‘मी विष घेतले आहे. मला खूप त्रास होतोय. मला न्याय मिळत नाही,’ असे त्यांनी गवारे यांना सांगितले. काही क्षणातचताठे यांना भोवळ आली. कामगार अधिकारी गवारे यांनी हा प्रकार गांभिर्याने घेतला आणि ताठे यांना तातडीने घाटी रुग्णालयात नेले.

ताठे यांनी केलेल्या आरोपांची पूर्ण चौकशी करून कोणीही दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

– रा. ना. पाटील,विभाग नियंत्रक, औरंगाबाद.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांसोबत चर्चा’, शरद पवार!

News Desk

HW Exclusive : हे सरकार चोऱ्या करायला बसले; पडळकरांचे सरकारवर हल्लाबोल

Aprna

‘पुन्हा येण्यात’ अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं – रोहित पवार 

News Desk