HW News Marathi
महाराष्ट्र

विलासराव नावाचं विद्यापीठ 

विलासराव नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचं . विषय कुठलाही असो त्यावर खुमासदार शैलीत भाषण करून अख्ख वातावरण फ्रेश करणारा नेता-वक्ता मी तरी बघितलेला नाही. आजमितीस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते पुढे आले , कित्येकांनी पक्ष बदलला पण ते आजही अभिमानानं सांगतात “होय, आम्ही विलासराव नावाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत “

ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता , या प्रवासानचं विलासराव नावाच्या विद्यापीठाला आकार दिला . एक चांगला शिक्षक एक पिढी घडवतो असं म्हणतात . विलासरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक पिढीच घडवल्या . लातूरमध्ये सुसंस्कृत राजकारणाची बीज विलासरावांनी रुजवली, पुढे ती बीजं जोपासली आणि वाढवलीही त्याची सावली आजही सगळे अनुभवत आहेत.
विलासरावांच्या दिसण्यातला स्मार्टनेस त्यांच्या कामातूनही दिसायचा . एखाद्याने सांगितलेले काम तो स्वतः विसरला तरी पुढच्या भेटीत विलासराव त्या व्यक्तीला सांगायचे काम मार्गी लागलं बरं का. भेटायला येणाऱ्या माणसाच्या वेशभूषेकडे न पाहता प्रत्येकाला सारख्याच सन्मानानं ते बोलाबोलायचे , हे प्रसंग मी कित्येकदा अनुभवले आहेत . पीसीओवरून सामान्य नागरिकांचे फोन उचलून बोलणारा मुख्यमंत्री मी तरी बघितलेला नाही . मी स्वतः याची खात्री केलेली आहे . आजकाल साध्या कार्यकर्त्यांकडे चार -चार मोबाईल फोन असूनही फोन न उचलण्याच्या तक्रारीचा सूर कायम ऐकायला मिळतो . तिथे मोठ्या नेत्यांची काय . काही सन्माननीय अपवाद असतीलही.
लातूरच्या शैक्षणिक वर्तुळाला विलासरावांनी कायम बळकटी दिलीय म्हणून आज लातूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. लातूर पॅटर्नला पाठबळ देत लातूरकरांची मान कायम अभिमानानं उंचावण्याचं श्रेय विलासरावांनाच जातं. लातूर जिल्हा म्हणून निर्माण झाल्यापासून ते आजचं लातूर पाहा , एक दूरदृष्टीचा नेता जिल्ह्याचा कसा कायापालट करू शकतो ते लक्षात येईल .
विलासराव नावाच्या विद्यापीठातून आजवर कित्येकजण घडले आणि पुढेही घडत राहतील . पक्ष किंवा प्रांत कुठलाही असो विलासरावांच्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं खुप आहे . त्यासाठी फक्त राजकीय जोडे बाजूला ठेवून विलासराव यांच्याकडे पाहायला हवं .
शेवटी , ज्यांच्या भाषणानं महाराष्ट्र कायम खळखळखळून हसलाय ते भाषण आता फक्त युट्यूब किंवा इतर उपलब्ध ठिकाणी ऐकावं लागतं , ही खंत आजही अस्वस्थ करते . विलासराव नावाच्या विद्यापीठात आजही सगळ्यांना प्रवेश आहे , फक्त इगो आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून या …
विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन . . .
स्नेहांकित ,
आनंद श्रीराम गायकवाड
9323660660
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अंजली दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं’ – छगन भुजबळ

News Desk

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk

समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? विरोधकांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk