HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

  • नाशिकमध्ये इंटरनेट सेवा बंद
  • नगरमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
  • राहुरीमध्ये दुधाचा टँकर पेटवला

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान क्रांती समितीच्या बैठकीतील काही मुद्दे शेतकऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळं नाशिकसह, अहमदनगर, सोलापूरसह राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सरकारच्या मित्रपक्ष शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री दुधाचा टँकर पेटवला. राहुरी खुर्द गोंटुबा आखाडा येथे ही घटना घडली. दरम्यान, एक जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप निर्णायक वळणावर पाेहाेचला असून अाता माघार घेणार नसल्याचा निर्धार सर्व शेतकरी नेत्यांनी जाहीर केला.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या दूध टँकरला झेड सुरक्षा. पोलिसांच्या ताफ्यात दुधाचे टँकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर रवाना झाल्याचं वृत्त आहे. एकूण 27 दुधाचे टँकर असून पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध सोमवारी सायंकाळपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

अहमदनगर-औरंगाबाद हायवेवर घोडेगाव चौफुल्यावर दुधाचे टँकर अडवून त्याच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मालेगाव तालुक्यातील नांदगांव येथे शेतकर्‍यांनी बराच वेळ रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. परभणीत संतप्त शेतकर्‍यांनी दूध मार्केटमधील दूध विक्रेत्यांनी हाकलून लावत कामकाज बंद पाडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मालेगाव-नांदगाव मार्गावरही शेतकर्‍यांनी निदर्शन करत रास्ता रोको केला. उगावात शेतकरी बैलगाडीसह रस्त्यावर उतरल्यानं निफाड चांदवड मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

हिंगोली – राज्यव्यापी बंदसाठी हिंगोलीत शिवसेना रस्त्यावर उतरली असून शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या महाराष्‍ट्र बंदचा पैठण आषाढी पूर्वच्या नाथवारीतील वारकर्‍यांना फटका बसू लागलाय. या संपाची झळ आता समाजातील सर्वच स्तरांना बसू लागली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्ष्मी विलास बँकेवर RBI चे निर्बंध, केवळ २५ हजार रुपयेच काढता येणार

News Desk

#Coronavirus : बुलढाण्यात ४ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्याची संख्या २१ वर

News Desk

आता ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, छगन भुजबळ करणार नेतृत्व!

News Desk