HW News Marathi
महाराष्ट्र

सनी लिओनला ‘बोल्ड’ प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला लातूरमध्ये धक्काबुक्की

लातूर – अभिनेत्री सनी लिओनीने आज लातूरमधील एका फिटनेस क्लबचं उद्घाटन केलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना एका पत्रकारानं तिला काहीसा ‘बोल्ड’ प्रश्न विचारला त्यावर आयोजकांनी आक्षेप घेत त्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्यानं काहीकाळ वातावरण चांगलच हॉट झालं होतं. मात्र, सनीनेच इट्स ओक म्हणत मध्यस्थी केल्यानं प्रकरण थंडावलंय. मात्र, पत्रकार संघटना आज सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहेत.
सनीच्या हस्ते एका फिटनेस क्लबचं उद्घाटन झालं. संध्याकाळी होणारा हा कार्यक्रम अचानकपणे दुपारीच उरकण्यात आला. त्यानंतर सनीने पत्रकारांशी संवाद साधला. मराठी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने सनीला “आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का”? असा प्रश्न विचारला. त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. ही बाचाबाची पुढे धक्का-बुक्कीपर्यंत पोहोचली. पण सनी लिओनीने मध्यस्थी करत, इट्स ओके म्हणत आयोजकांना आवरलं. इतकंच नाही तर पुढे प्रकरण चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकाराननंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफीनामाही सादर केला
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

Aprna

मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा!

News Desk

मराठा आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk