HW News Marathi
महाराष्ट्र

सोशल मीडियावर नजर

निवडणूक आचारसंहिता

अवैध दारू, समाज माध्यमांतील

संदेशांवर राहणार कडक नजर

जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठक संपन्न

उत्तम बाबळे

नांदेड औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ , जि.प.आणि पंचायत समिती निवडणुकीत अनुशंगाने समाज माध्यमांतील संदेशांवर कडक नजर ठेवावी असे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठकीत दिले आहेत.

जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलात आहे. त्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल, यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारुचा वापर, तसेच समाज माध्यमातील (सोशल मीडिया) संदेशावरही कडक नजर ठेवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये, राऊतांचा विरोधकांना सल्ला  

News Desk

समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

News Desk