HW News Marathi
महाराष्ट्र

सहा भाविकांना विषबाधा, एकाचा मृत्यू

सातारा : मांढरदेव येथे काळेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या बारामतीच्या सहा भाविकांना विषबाधा झाली. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधेचे कारण समजू शकले नाही. स्वप्नील विष्णू चव्हाण (वय 25) असे मृताचे नाव असून, तृप्ती विष्णू चव्हाण (वय 16), प्रतीक्षा विष्णू चव्हाण (21), सुनीता विष्णू चव्हाण (45), मुक्ताबाई नारायण चव्हाण (58), चालक भीमसेन अर्जुन जाधव अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

बारामती येथील श्रीरामनगरमधील चव्हाण कुटुंबातील पाच जण स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच 42 एएच 7074) मांढरदेव येथे दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर या कुटुंबातील स्वप्नीलला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने पार्किंगमध्ये असलेल्या गाडीच्या चालकास फोन करून गाडी वर घेऊन येण्यास सांगितले. चालक गाडी वर घेऊन गेला. सर्वांना वाईला आणत असताना घाटातच स्वप्नीलला व इतरांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर अन्य रुग्णांना सातारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कॅबिनेट मंत्री गुलाबरा पाटील यांच्या स्वागतादरम्यान चेंगराचेंगरी, २ महिला, ५ जण जखमी

News Desk

CETचं वेळापत्रक जाहीर ; वाचा सविस्तर वेळापत्रक

swarit

“दरेकरांचं जाकिट बघून कोरोना म्हटला असेल जाकीटातून कुठे आत शिरु” -अजित पवार

News Desk
मुंबई

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

मुंबई | नाशिक ते मुंबई असा सुमारे दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी विधानभवनाला घेराव घालणार आहेत. दरम्यान, मोर्चाची व्याप्ती पाहून सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तत्काळ मंत्रिगटाची स्थापना करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजचा शेतकरी नेत्यांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

शेतकरी मोर्चामुळे संपूर्ण आझाद मैदन परिसरात लाल सागर पसरला आहे. गेल्या सहा दिवसांपासून उन वाऱ्याची पर्वा न करता, पिचलेला शेतकरी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, वन जमिन शेतकऱ्यांच्या नावे मिळावी, ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लाठ्या काठ्या खावू वेळ पडल्यास गोळ्या झेलू परंतु मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचे समजते.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच हा मुद्दा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करून सरकार सहा दिवस झोपले होते, का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

News Desk

रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच | राज ठाकरे

News Desk

मुंबईमधील वाडिया रुग्णालयातील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आग

Aprna