HW News Marathi
देश / विदेश

बुलढाण्यात आणखी १ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आता एकूण ४ ‘कोरोना’बाधित

बुलढाणा | बुलढाण्यात मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील आणखी एक जण आज (१ एप्रिल) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (२८ मार्च) सकाळी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ३४ नागरिकांचे सॅम्पल्स कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते तर त्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर आता आणखी एक जण पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलढाण्यात आता एकूण ४ कोरोना पॉझिटिव्ह असून आणखी ८ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने आता हा भाग सील केला असून या भागातील सर्व नागरिकांची तपासणी केली जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’ करणार फेब्रुवारीत अंतिम सुनावणी 

swarit

निर्भया प्रकरणात सोनिया गांधींच अनुकरण करा…

swarit

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

Aprna